Skip to main content

Featured

माझी आई

                      आई  एक नाव असतं आई एक नाव असतं आई…. आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही जत्रापांगतेपाल उठतात पोरक्याजमि उमाळे दाटतात आई मनामनात तशीच ठेउन जाते काही जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा घर उजळते तेव्हा तीच नसत भान विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडत रान  आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ? आई खरच काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते दुधावरची साय असते, लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही .

तू माझी झालीस , प्रेम कविता

freewheel.tv,899777,DIRECT
PopAds.net - The Best Popunder Adnetwork

।।तू माझी झालीस , प्रेम कविता।। 

रोज होतीस भेटत 
पण तेंव्हा वेगळी वाटलीस     
कळलं नाही मला                
तू कधी माझी झालीस.          

सुर्यास्त पहाण्याचा 
तुला होता छंद 
माझ्या निर्मळ प्रेमाचा 
नव्हता तुला गंध 
त्या संध्याकाळी तू
खुप वेळ थांबलीस 
बोलता बोलता अचानक 
थोडी तू अडखळलीस 
कळलं नाही मला 
तू कधी माझी झालीस
मावळत्या प्रकाशात 
चेहऱ्यावर तुझ्या लाली 
अंधुकश्या उजेडात 
लाज पसरलेली गाली 
नेहमी बडबडणारी 
तू शांत तेंव्हा होतीस 
चोरट्या तिरक्या नजरेने 
पहात तू हसलीस 
कळलं नाही मला 
तू कधी माझी झालीस
सुर्य गेला क्षितिजाआड 
कि पाठ तुझी फिरायची 
पण त्या दिवशी नव्हती 
घाई तुला जाण्याची 
क्षितिजाचे ते रंग 
न्याहाळत तू राहिलीस 
गुढ वेगळ्या विचारात 
होती तू हरवलीस 
कळलं नाही मला 
तू कधी माझी झालीस
बावरलेली तुझी नजर 
नव्हती माझ्याकडे वळली 
मनातली तुझ्या चलबिचल 
होती ग मला कळली 
माझ्या शेजारी येवुन 
आपसुकच तू बसलीस 
नेहमीचा तो स्पर्श 
पण तू थोडी शहारलीस 
कळलं नाही मला 
तू कधी माझी झालीस
तू हलकेच टेकवलेस 
डोकं माझ्या खांद्यावर 
तरंगत असलेलं तुझं मन 
होतं विसावलं माझ्यावर
बंधनं सारी झुगारून 
मला तू बिलगलीस 
पापण्या मिटुन डोळ्यांच्या 
प्रेमाची तू कबुली दिलीस
कळलं नाही मला 
तू कधी माझी झालीस 
कळलं नाही मला 
तू कधी माझी झालीस

  





           

PopAds.net - The Best Popunder Adnetwork
freewheel.tv,899777,DIRECT

Comments

Post a Comment

Popular Posts